Advertisement

Ad code

GAU NAKO KISNA - SOUNDCHECK - DJ OMP SANGOLA - SOLAPUR DOWNLOAD MP3

 

'महाराष्ट्र शाहीर'मधील नवीन गाणे:चिमुकल्या जयेश खरेने स्वरबद्ध केले 'गाऊ नको किसना' गाणे, 'चंद्रा...' गाण्यामुळे आला प्रसिद्धीझोतात


'चंद्रमुखी' या चित्रपटातील चंद्रा... हे गाणे आपल्या खणखणीत आवाजात गाणारा चिमुकला जयेश खरे तुम्हाला आठवतोय का... सहावीत शिकणा-या जयेश खरेचा गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो एका रात्रीतून प्रसिद्धीझोतात आला. अस्सल मातीतील हिरा म्हणून जयेशचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. जयेशचा हा व्हायरल व्हिडिओ थेट संगीतकार जोडी अजय-अतूल यांच्यापर्यंत पोहोचला आणि आता तो सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण करतोय. केदार शिंदेंच्या आगामी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातील 'गाऊ नको किसना' हे गाणे जयेशने स्वरबद्ध केले असून आज हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

'गाऊ नको किसना' या गाण्यात शाहीर साबळेंच्या बालपणाची झलक पाहायला मिळते. भजन-कीर्तन, भारुडं, ओव्यांमध्ये रमणारा लहानगा किसना पण त्यासोबतच आईचा असलेला धाक याचं सुरेख चित्रण या गाण्यात करण्यात आले आहे. गुरु ठाकूर यांच्या शब्दांना अजय-अतुलच्या संगीताची जोड मिळाली आहे.

अजय-अतुल यांनी हेरले चिमुकल्या जयेशचे गायन कौशल्य
सहा महिन्यांपूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जयेशचा अजय अतुल यांच्यासोबतचा साँग रेकॉर्डिंगचा व्हिडिओ शेअर केला होता. "अस्सल मातीतला कलाकार व्हायरल व्हिडिओने सापडतो. आणि थेट अजय अतुल यांच्यापर्यंत पोहोचतो... महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी त्याचं गाणं रेकॉर्ड होतं... इतिहास असाच लिहिला जातो. महाराष्ट्र शाहीर... 28 एप्रिल 2023..." असे केदार शिंदे यांनी म्हटले होते. केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात अंकुश चौधरी आणि सना शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.        























• DOWNLOAD MP3 ( 320 KBPS )     CLICK ON  MEDIAFIRE / DRIVE  LOGO  FOR DOWNLOAD MP3   :-






𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹𖦹

              Ⓣ︎Ⓗ︎Ⓐ︎Ⓝ︎Ⓚ︎ Ⓨ︎Ⓞ︎Ⓤ︎  
        🅓︎🅙︎ 🅞︎🅜︎🅟︎ 🅢︎🅞︎🅛︎🅐︎🅟︎🅤︎🅡︎ 

❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎❣︎


Post a Comment

0 Comments